पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी एनडीएकडून ओम बिर्ला

ओम बिर्ला

१७ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून NDA राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विरोधकांनी या पदासाठी उमेदवार न दिल्याने ओम बिर्ला यांची निवड निश्चित झाली आहे. बुधवारी ते लोकसभेचे अध्यक्षपद सांभाळतील. 

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अनेक ज्येष्ठ सदस्यांना डावलून भाजपने दुसऱ्यांदा खासदार झालेल्या ओम बिर्ला यांची निवड केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपने ज्येष्ठांपेक्षा इतरांना संधी देण्याला प्राधान्य दिल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांनी ओम बिर्ला यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रामनारायण मीन यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता. ओम बिर्ला हे सुमित्रा महाजन यांच्यानंतर १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष असतील. सुमित्रा महाजन या सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या. पण यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Om Birla BJP MP from Kota likely to be the NDA candidate for the post of Lok Sabha Speaker