पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार ओल्गा टोकारझूक आणि पीटर हांडके यांना जाहीर

ओल्गा टोकारझूक आणि पीटर हांडके

साहित्य क्षेत्रासाठीच्या नोबेल पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यंदा २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांसाठीचे साहित्य क्षेत्रातील नोबेल जाहीर करण्यात आले आहेत. २०१८ वर्षासाठीचा नोबेल पुरस्कार प्रख्यात पोलिश लेखिका ओल्गा टोकारझूक यांना तर २०१९ साठीचा नोबेल पुरस्कार ऑस्ट्रियन लेखक पीटर हांडके यांना जाहीर झाला आहे. 

रस्त्यावर प्रचार सभा घेऊ द्या; मनसेची निवडणूक आयुक्तांकडे मागणी

लैंगिक छळवणुकीच्या प्रकारावरून गेल्यावर्षीचा साहित्य क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार त्यावर्षी जाहीर करण्यात आला नव्हता. साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. दरवर्षी याच काळात विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यंदाच्यावर्षी आतापर्यंत नऊ नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

ओल्गा टोकारझूक यांचा जन्म १९६२ मध्ये पोलंडमध्ये झाला. १९९३ मध्ये त्यांचे पहिले पुस्तक ‘Podroz Iudzi Ksiegi प्रकाशित झाले होते. १९९६ मध्ये आलेले त्यांची Prawiek i inne czasy ही कादंबरी विशेष गाजली होती.

सरकारचा पीएमसी बँक घोटाळ्याशी काहीही संबंध नाही: निर्मला सीतारामन

पीटर हांडके यांचा जन्म १९४२ मध्ये झाला. १९६६ मध्ये त्यांचे पहिले पुस्तक Die Hornissen प्रकाशित झाले होते. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते.