पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'... तर तेलाच्या किंमती कल्पनेपलीकडे भडकतील'

इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे भारताने केलं बंद

इराणच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले नाही, तर तेलाच्या किंमती भविष्यात कल्पनेपलीकडे भडकतील, असे सूचक विधान सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. त्याचवेळी या प्रश्नावर लष्करी कारवाई हा उपाय नसून, राजकीय पद्धतीने यावर तोडगा काढला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ईडी, सीबीआय हे भाजपच्या विजयाचे मजबूत आधारस्तंभः संजय राऊत

गेल्यावर्षी पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. पण आपण या हत्येचे आदेश दिले नव्हते, असेही मोहम्मद बिन सलमान यांनी स्पष्ट केले आहे. तरीही देशाचा प्रमुख म्हणून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावरच आहे. त्यामुळे या घटनेतील जबाबदारी मला नाकारता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जमाल खाशोगी यांच्या हत्येनंतर जगभरातून त्याचा निषेध करण्यात आला होता. अनेकांनी त्यावेळी सौदी अरेबियाच्या राजांवरच संशय व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली बाजू मांडली.

मोहम्मद बिन सलमान म्हणाले, इराणला रोखण्यासाठी जर संपूर्ण जग एकत्र आले नाही आणि त्यांनी प्रयत्न केले नाहीत, तर हा विषय आणखी चिघळेल आणि त्यामुळे जगातील वेगवेगळ्या देशांना धोका निर्माण होईल. यामुळे तेलाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होईल. तेलाचा पुरवठाच कमी झाल्यामुळे त्याचे भाव कल्पनेपलीकडे वाढतील. आतापर्यंत कधीच बघितले नव्हते, अशा पातळीवर हे भाव जाऊन पोहोचतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

जर भविष्यात इराण आणि सौदी अरेबिया यांच्या युद्ध भडकले, तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.