पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारत मोठ्या प्रमाणात यशस्वी, तरीही...

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गंभीर निर्णय घेण्यात येत आहेत.

भारताने कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. पण तरीही येत्या काही दिवसांत परिस्थिती खूप बिघडली तरी त्यासाठी तयारी करण्यात येत आहे. केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. देशातील आठ राज्यांमध्ये १२०० कंटेंन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तिथे लॉकडाऊनची अत्यंत गंभीरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गंभीर निर्णय घेण्यात येत आहेत.

लॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल

कोरोना विषाणूचा रुग्णाच्या शरीरातून नायनाट करण्यासाठी तूर्त उपयुक्त ठरत असलेली हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एझिथ्रोमायसिन ही औषधे पुरेशा प्रमाणात देशातील सर्व राज्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

जगात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एझिथ्रोमायसिन या दोन्ही औषधांच्या वापरामुळे रुग्ण लवकर कोरोना विषाणूमुक्त होत आहेत. त्यामुळे जगभरातून या दोन्ही औषधांची मागणी वाढली आहे. याच आठवड्यात केंद्र सरकारने या दोन्ही औषधांची निर्यात करण्याला मंजुरी दिली. ही दोन्ही औषधे ब्राझील, अमेरिका आणि इस्रायलला पाठविण्यात येणार आहे. सध्या भारताकडे या दोन्ही औषधांची जेवढी अतिरिक्त संख्या आहे तीच परदेशात पाठविण्यात येत आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनामुळे अखेर चीनमध्ये श्वानाचे मांस विकण्यास बंदी

अर्थात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एझिथ्रोमायसिन ही दोन्ही औषधे या रोगावर कितपत प्रभावी आहेत, याबद्दल खूप चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. पण सध्याच्या स्थितीत ही दोन्ही औषधे सगळ्याच देशांना आशादायी वाटताहेत. त्यामुळे त्याची मागणी वाढते आहे. भारताने सार्क गटातील देशांना त्याचबरोबर मॉरिशसलाही ही औषधे भेट म्हणून पाठविली आहेत.