पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

COVID-19: ओडिशा सरकार उभारणार देशातील सर्वात मोठे रुग्णालय

ओडिशामध्ये रुग्णालय बांधण्यासाठी बैठक पार पडली

कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओडिशा सरकार कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशातील सर्वात मोठे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयात १,००० बेड असणार आहेत.  पुढच्या १५ दिवसांमध्ये या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. ओडिशा सरकार, कॉर्पोरेट्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गुरुवारी महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी १००० बेडचे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

झोमॅटो, स्विगी डिलिव्हरी करण्यास तयार पण रेस्तराँच बंद
 
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या बांधकामाची तयारी ओडिशा सरकारने सुरु केली आहे. ओडिशा हे देशातील पहिले राज्य आहे जे कोविड -१९ रूग्णांच्या उपचारासाठी खास मोठे रुग्णालय सुरु करणार आहे. ओडिसामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेले फक्त दोनच रुग्ण आढळले आहेत. तर, देशामध्ये ६४९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  

नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वाराने पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

दरम्यान, ओडिशामध्ये हे रुग्णालय कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. तर दुसरीकडे, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आसाम सरकारने गुवाहाटीच्या इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियममध्ये विलगीकरण कक्षाच्या बांधकामाला सुरुवात देखील केली आहे. आसामचे मंत्री हेमंत विश्व शर्मा हे स्वत: त्याठिकाणी उपस्थित आहेत. आसाममध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्यात २२,११८ खोल्या सज्ज : अशोक चव्हाण