पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...अन आदेश मिळताच जाळून टाका; काँग्रेस नेत्याचा तो व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस नेते प्रदीप मांझी

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काँग्रेस देशभरात हिंसा भडकवत असल्याचा आरोप भाजप वारंवार करत आहे. याच दरम्यान ओडिशातील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप मांझी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रदीप मांझी आपल्या कार्यकर्त्यांना आग लावण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल तयार ठेवा असे आदेश देत आहेत. पोलिसांनी प्रदीप मांझी यांच्याविरोधात हिंसा भडकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. 

 

खातेवाटपावरून काँग्रेस नेत्यांची नाराजी उघड, मुख्यमंत्र्यांना साकडे

ओडिशातील नबरंगपूरमध्ये राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या घटनेविरोधात काँग्रेसने गुरुवारी १२ तासांच्या बंदची हाक दिली होती. आंदोलनकर्त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत देण्याची मागणी करत होते. 

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, रेल्वे तिकीटाचे दर वाढण्याचे संकेत..

नबरंगपूरमध्ये काँग्रेस नेते प्रदीप मांझी आंदोलन करत होते. पालिसांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी मांझी यांचा पोलिसांसोबत वाद झाला. यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्याला फोन करत सांगितले की, 'पेट्रोल आणि डिझेल तयार ठेवा. जसे आदेश मिळतील तसेच सर्वकाही जाळून टाका' त्यानंतर आंबेडकर चौकात एका कारला आग लावण्यात आली होती. 

चालकाला डुलकी लागल्याने द्रुतगती मार्गावर अपघात; एक

नबरंगपूर पोलिस अधिक्षक नितीन कुसाळकर यांनी सांगितले की, काँग्रेसचे नेते प्रदीप मांझी यांच्याविरोधात हिंसा भडकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल. दरम्यान प्रदीप मांझी यांनी सांगितले की, 'महिला आणि लहान मुलींवर बलात्कार होत आहेत. अशा स्थितीमध्ये आम्ही आणखी गप्प बसू शकत नाही. माझा लोकशाहीवरील विश्वास कमी झाला आहे.'

'होय, हिंदू असल्यामुळेच मला पाक संघात भेदभाव सहन करावा लागला'