पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...आता एका रिक्षाचालकाला ठोठावला ४७,५०० रुपयांचा दंड!

रिक्षाचालकाला ४७५०० रुपयांचा दंड

गुरुग्राममधील एका दुचाकी चालकाला मोटार वाहन कायद्यातील सुधारणांनंतर तब्बल २३ हजार रुपयांचा दंड भरावा लागल्याची घटना ताजी असतानाच आता भुवनेश्वर येथील एका रिक्षाचालकाला मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ४७,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. हरिबंधू कन्हार असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.

मुंबईत तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा पूर्वपदावर, पावसाची विश्रांती

हरिबंधू कन्हार हे वाहन चालविण्याच्या परवान्याशिवाय रिक्षा चालवत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे वाहन नोंदणी प्रमाणपत्र नव्हते, रिक्षा चालविण्याचे परमिट नव्हते, संबंधित वाहनाचे पीयूसी आणि विमा उतरविलेला नव्हता, या सगळ्या गोष्टींमुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ४७५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या संदर्भात कनिष्ठ प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप पैक्रे म्हणाले, हरिबंधू कन्हार यांच्याकडे रिक्षाचे परमिट नव्हते, त्याचबरोबर ते मद्यपान करून गाडी चालवित होते, त्यांच्या गाडीमुळे प्रदूषण होत होते, या सगळ्याबद्दल त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, वाहन नोंदणीची मुदत उलटून गेली होती, त्याचबरोबर अनधिकृत व्यक्ती रिक्षा चालवत होती, या सगळ्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विम्याशिवाय गाडी चालवत असल्याबद्दल २००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

काँग्रेसचे संकटमोचक शिवकुमार ९ दिवस ईडीच्या कोठडीत

दंडांची रक्कम भरू शकत नसल्याचे सांगितल्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संबंधित रिक्षा जप्त केली आहे.