पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली १०७ वर

देशात कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली ९३ वर

देशभरात कोरोना विषाणूग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या बाबतच्या ताज्या आकडेवारीनुसार पॉझिटिव्ह प्रकरणांचा आकडा रविवारी १०७ पर्यंत पोहोचला आहे. देशात दोन रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या आजारामुळे संपूर्ण जगभरात ५००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

CoronaVirus: इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय मायदेशी परतले

अनेक राज्यांनी शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक संस्था आणि चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यात निषेधाज्ञा जारी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाचहून अधिक लोकांना एकत्रित येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 

पोलिस पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

गोवा सरकारनेही जलतरण तलाव आणि पब रविवारी मध्य रात्रापासून बंद करण्याची घोषणा केली आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठानेही खबरदारीचा उपाय म्हणून २२ मार्चपर्यंत सर्व वर्ग बंद ठेवले आहेत. सर्व संमेलन, कार्यशाळा, शैक्षणिक सहली आणि क्रीडा कार्यक्रम ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. तर विद्यापीठ आणि शाळांमधील परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार.

राज्यपालांचा कमलनाथ सरकारला आदेश, उद्याच बहुमत चाचणी

पंजाब सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गर्दी करु नये असे आदेशही देण्यात आले आहेत.