पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचारः अजित डोवाल यांचा मध्यरात्री आढावा दौरा

अजित डोवाल

ईशान्य दिल्लीत मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या हिंसाचारात एका हेड कॉन्स्टेबलसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार प्रभावित परिसरात पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून हिंसा करणाऱ्याला आता दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा हिंसाचार प्रभावित भागाचा दौरा केला. त्यांनी सीलमपूर, भजनपुरा, मौजपूर, यमुना विहारसारख्या हिंसा प्रभावित भागाचा आढावा घेतला. 

दिल्ली : हिंसा करणाऱ्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

एनएसए डोवाल रात्री सुमारे साडेअकरा वाजता सीलमपूर येथील ईशान्य दिल्लीच्या उपायुक्त कार्यालयात पोहोचले. तिथे बैठक घेऊन सुरक्षेच्या स्थितीची समीक्षा केली. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीनंतर उपायुक्त ईशान्य दिल्ली, विशेष पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) एस एन श्रीवास्तव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

बैठकीनंतर डोवाल हे हिंसाचार प्रभावित क्षेत्राचा दौरा करण्यासाठी निघाले. रात्री उशिरा ते सीलमपूर, भजनपुरा, यमुना विहार, मौजपूरसारख्या हिंसाचार प्रभावित भागात फिरत राहिले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते परतले. 

दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (गुन्हे) सतीश गोलचा यांनी आंदोलकांनी जाफराबाद मेट्रो स्टेशन आणि मौजपूर चौक रिकामा केल्याचे सांगितले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ते म्हणाले. 

दिल्ली हिंसाचार: आतापर्यंत १३ जणांनी गमावला जीव

तत्पूर्वी, गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिस आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. मागील २४ तासांमध्ये शहांची ही तिसरी बैठक होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक रात्री ७ वाजता सुरु झाली आणि रात्री १० वाजता संपली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NSA Ajit Doval review the security situation in different parts of North East Delhi where violence occured against caa