पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार : अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

अजित डोवाल

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन दिल्लीमध्ये हिंसाचाराची घटना घडली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी घटनास्थळी जाऊन  नागरिकांशी संवाद करत परिस्थितीचा आढावा घेतला.  याठिकाणचा आढावा घेतल्यानंतर डावाल यांनी रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत दिल्लीतील परिस्थितीची माहिती त्यांना दिली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 

अजित डोवाल यांच्याकडून दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागांची पाहणी

तत्पूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती.ईशान्य दिल्लीमधील जाफराबादमधील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनात शनिवारी दोन गटात दगड फेकीचा प्रकार घडला. त्यानंतर या भागातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

 

सोनिया गांधींच्या वक्तव्याचा जावडेकरांकडून समाचार

हिंसक आंदोलनामध्ये आतापर्यंत २२ जणांनी आपले प्राण गमावले असून २०० हून अधिक जण यात गंभीर जखमी झाले आहेत. जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, यमुना विहार, भजनपूरा, चांद बाग, शिव विहार याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दिल्लीतील या भागातील नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाने डोवाल यांच्याकडे सोपवली होती.