पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वेच्या या कारवाईमुळे आता अधिक तत्काळ तिकीट उपलब्ध होणार

तात्काळ तिकिटांचा घोळ मिटला

अवैधरित्या तत्काळ तिकीट बुकींग करणाऱ्या सॉफ्टवेअरचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात ६० एजंट्सना अटक करण्यात आली असून सॉफ्टवेअर निष्क्रिय करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. यामुळे पूर्वीपेक्षा अधिक तत्काळ तिकीट सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) चे महानिदेशक अरुण कुमार म्हणाले की, रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे प्रवाशांसाठी तत्काळ तिकीट पूर्वीपेक्षा अधिक वेळेपर्यंत उपलब्ध राहतील. पूर्वी बुकींग सुरु झाल्यानंतर काही वेळातच तत्काळ तिकीट संपायची.

'२६/११ चा हल्ला हा 'हिंदू दहशतवादी' दाखवण्याचा कट शिजला होता'

 अटक करण्यात आलेल्यामध्ये एक जण कोलकाता येथील असून हा व्यक्ती बांगलादेशमधील जमात-उल-मुजाहिद्दीन या बांगलादेशस्थित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एएनएमएस, मॅक आणि जगुआर यासारख्या अवैध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बुकींग करण्यात येत होते. या सॉफ्टवेअरमुळे १.४८ मिनिटांतच तिकीट बुक करण शक्य होते. सामान्य प्रवाशाला तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी २.५५ मिनिट इतका वेळ लागतो. तत्काळ तिकीट बुकींगची कोणत्याही एजंटला परवानगी नाही.

पाकचा तो डाव फसणार अन् डोकेदुखी कायम राहणार

मात्र अवैधरित्या मोठ्या प्रमाणात तात्काळ तिकिटांचे बुकींग केले जायचे. मागील दोन महिन्यात अवैध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तिकीट बुकींग करणाऱ्या  ६० जणांना अटक करण्यात आली आहे. आतापासून अवैध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एकही तिकीट बुकींग होणार नाही, त्यामुळे तत्काळ तिकीट बुकींगचा काळा बाजाराला लगाम बसणार आहे. याचा लाखो प्रवाशांना फायदा होईल, अशी माहिती कुमार यांनी दिली आहे.