पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फक्त तीन तासांत ताजमहाल पाहा, नाहीतर....

ताजमहाल

आग्रा येथील ताजमहालाच्या परिसरात तीन तासांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या पर्यटकांकडून जास्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात भारतीय पुरातत्त्व खात्याने एक परिपत्रक जारी केले असून, याची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. ताजमहालाच्या आवारात कोणी बेकायदा घुसू नये, यासाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर नव्या तंत्रज्ञान वापरलेले दरवाजेही बसविण्यात येणार आहेत.

भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक वसंत कुमार म्हणाले, ताजमहाल आवारातील पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला सात ठिकाणी नव्या तंत्रज्ञानाचे दरवाजे बसविण्यात येणार आहेत. ज्या पर्यटकाकडे पैसे देऊन घेतलेले टोकन आहे, त्यालाच या दरवाज्यातून प्रवेश दिला जाईल. जर एखादा प्रवासी तीन तासांपेक्षा जास्त वेळ आत थांबला असेल, तर त्याला बाहेर पडताना पुन्हा आपले टोकन रिचार्ज करावे लागेल. त्याशिवाय त्याला बाहेर पडता येणार नाही.

OBC च्या २७ टक्के आरक्षणाची ३ उपगटांत विभागणी होण्याची शक्यता

आतापर्यंत ताजमहालाच्या परिसरात आत गेल्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबण्याची परवानगी होती. पण आता त्यावर बंधन आले आहे. अनेक पर्यटकांनी या नव्या नियमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे ताज महालाच्या परिसरात येणारे पर्यटक कमी होतील, असे काही जणांनी म्हटले आहे. ताजमहालाच्या आवारातील पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.