पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस तोंडघशी, काही आमदार कलम ३७० रद्द करण्याचा बाजूने

आदिती सिंग

कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा काँग्रेस पक्षाने विरोध केला असला, तरी या मुद्द्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. हा निर्णय योग्यच असल्याचे काँग्रेसच्या काही नेत्यांनी म्हटले आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार आदिती सिंग यांनी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष तोंडघशी पडला आहे. 

... हा तर सत्तेचा गैरवापर, राहुल गांधींची कलम ३७० वरून सरकारवर टीका

आदिती सिंग म्हणाल्या, मी सरकारच्या या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन करते. त्यामुळे जम्मू-काश्मिरला मुख्य प्रवाहात घेऊन येणे शक्य होईल. हा खरंच ऐतिहासिक निर्णय आहे. त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. एक आमदार म्हणून वैयक्तिकपणे मी या निर्णयाचे स्वागत करते. आदिती सिंग या रायबरेली सदर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

काँग्रेस नेते आणि राजस्थानमधील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अशोक चंदना म्हणाले, कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. ही माझी वैयक्तिक प्रतिक्रिया आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणी शांततामय पद्धतीने केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

काश्मीरसाठी आमची प्राण देण्याची तयारी - अमित शहा

काँग्रेसने राज्यसभा आणि लोकसभेत या विधेयकाला विरोध केला आहे. राज्यसभेत सोमवारी काँग्रेसच्या खासदारांनी जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते.