पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आता प्रवाशांना मिळणार फक्त अर्धा लिटर रेल नीर

रेल नीर

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी यापुढे शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एक लिटरऐवजी अर्धा लिटर पाण्याची बाटलीच देण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण क्षमतेने देशातील सर्व शताब्दी एक्स्प्रेसमध्ये हा निर्णय लागू होणार आहे.

फडणवीसांना मुख्यमंत्री करुन दाखवा, राऊतांचे भाजपला चॅलेंज

शताब्दी एक्स्प्रेसमधून पाच तासांपेक्षा जास्त वेळ प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधी एक लिटर पाण्याची बाटली (रेल नीर) दिली जात होती. पण आता या प्रवाशांना अर्धा लिटरची पाणी बाटली दिली जाणार आहे. रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

शताब्दी एक्स्प्रेसच्या माध्यमातून सर्वात मोठा प्रवास हा साडे आठ तासांचा आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की आतापर्यंत शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना पाच तासांपर्यंतच्या प्रवासासाठी अर्धा लिटर तर त्यापेक्षा जास्त वेळेच्या प्रवासासाठी एक लिटर पाण्याची बाटली दिली जात होती. पण आता सर्वच प्रवाशांना अर्धा लिटर पाणीच दिले जाणार आहे. जर प्रवाशांना मोठी बाटली दिली तर पाण्याचा अपव्यय जास्त होतो, असे लक्षात आल्याने हा निर्णय घेण्याचे आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

... म्हणून शिवसेनेच्या आमदारांना रंगशारदामध्ये ठेवलंय

प्रवासामध्ये प्रवासी जास्त पाणी घेऊ शकतात. पण त्यांना त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.