पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू प्लॅस्टिक, स्टीलवर २ ते ३ दिवस सक्रिय राहतात, नवे संशोधन

कोरोना विषाणू हवेतही २ ते ३ तास सक्रिय राहू शकतात. (फोट - रॉयटर्स)

कोरोना विषाणूचा मुकाबला करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाची माहिती आहे. कोरोना विषाणू कोणत्याही पृष्ठभागावर किंवा हवेत खूप वेळ सक्रिय राहतो, असे अमेरिकेतील एका संशोधनात आढळून आले आहे. सार्सप्रमाणेच हा विषाणू जास्त काळ मानवी शरीराबाहेर सक्रिय राहतो, असे संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

पुण्यात कोरोनाचा नवा रुग्ण, राज्यात बाधितांची संख्या ४२ वर

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एँड प्रिव्हेन्शन संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनानुसार कोरोना विषाणू हे प्लॅस्टिक आणि स्टीलवर दोन ते तीन दिवस सक्रीय राहू शकतात. त्याचवेळी पुठ्ठ्यावर ते २४ तास सक्रिय राहू शकतात. हवेमध्येही हे विषाणू तीन तास सक्रिय राहू शकतात, असे निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी काढले आहेत. 

काही शास्त्रज्ञांनी या निष्कर्षांवर टीका केली आहे. हे निष्कर्ष खूप वाढवून सांगण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या कालावधीसाठी कोरोना विषाणू कार्यरत राहात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. खोकला किंवा शिंका यातूनच कोरोना विषाणू हवेत मिसळतात. त्यानंतर ते खूप कमी वेळ हवेत सक्रिय राहू शकतात, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी 'शुकशुकाट' रणनिती

गेल्या आठवड्यात मेडिकल प्री-प्रिंट वेबसाईटवर या संशोधनाचे निष्कर्ष सर्वात आधी प्रकाशित झाले होते.