पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून गांधी कुटुंबाच्या SPG सुरक्षेच्या मुद्द्यावर अमित शहांऐवजी नड्डा यांनी उत्तर दिले

जे पी नड्डा (सौजन्य राज्यसभा टीव्ही)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारवर टीका केली. पण एसपीजी सुरक्षा काढण्याच्या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सभागृहात सांगितले. काँग्रेसकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, त्यावेळी सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित नव्हते. इतर कोणत्याही मंत्र्याने या प्रश्नावर उत्तर दिले नाही. त्यामुळे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सरकारच्या वतीने उत्तर दिले.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून ईडीला नोटीस

राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले, गांधी कुटुंबियांच्या सुरक्षेचा मुद्दा हा कोणत्याही राजकारणापेक्षा मोठा आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरआढावा घेतला जावा आणि त्यांना एसपीजी सुरक्षाकवच दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचेही एसपीजी संरक्षण ऑगस्ट महिन्यात काढून घेण्यात आले होते. या सर्वांना आता झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे गांधी कुटूंब आणि मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता एनसजी किंवा केंद्रीय राखीव पोलिस दलावर (सीआरपीएफ) आहे.

बजेटमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या, RSSचा केंद्राला सल्ला

मंगळवारी लोकसभेतही या मुद्दयावरून काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी सरकारला धारेवर धरले होते. गांधी कुटुंबातील तिघांच्याही जीविताला आजही धोका आहे. त्यामुळे त्यांना पु्न्हा एसपीजी सुरक्षा देण्याची मागणी आनंद शर्मा यांनी केली. या प्रकरणावरून त्यांनी राज्यसभेत कामकाज तहकुबीची सूचना अध्यक्षांकडे दिली होती.