पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मोलाचा सल्ला

सरन्यायाधीश  रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत

सरन्यायाधीश रंजन गोगोई  यांचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी दहा खटल्यांबद्दल नोटीसही जारी केल्या. १७ नोव्हेंबरला गोगोई हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. न्यायाधीशांनी त्यांचे स्वातंत्र उपभोगताना मौन बाळगणे आवश्यक आहे असा मोलाचा सल्लाही गोगोई  यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला. 

INDvsBAN: मयांकच्या द्विशतकासह टीम इंडियाच्या नावे अनोखा विक्रम

गोगोई यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून निरोप देण्यात आला. निरोपसमारंभावेळी त्यांचे उत्तराधिकारी न्या. शरद बोबडेही बाजूला बसले होते. यावेळी न्यायाधीशांचे खरे स्वातंत्र्य हे मौनातच आहे असा सल्ला गोगोईंनी दिला. आवश्यकता असेल तेव्हा बोला, बोलणे हे कर्तव्य आहे मात्र त्यापलीकडे  मौन बाळगणे कधीही चांगले असं ते म्हणाले. 

रेल्वेत चहा-नाश्ता, जेवण महागणार, जाणून घ्या नवे दर

गोगोई हे ६४ वर्षांचे आहेत. त्यांनी ३ ऑक्टोबर २०१८ मध्ये सरन्यायाधीश पदाचा पदभार स्विकारला होता.  रंजन गोगोई यांचे गेले दोन आठवडे खूपच व्यग्रतेत गेले. या काळात आयोध्या, राफेल, शबरीमाला या महत्त्वाच्या प्रकारणावर सुनावणी झाली.