पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उपचाराने बरे वाटत नसल्याने रुग्णाकडून डॉक्टरांच्या पत्नीचा खून

प्रातिनिधिक छायाचित्र

त्वचारोगावर डॉक्टर करीत असलेल्या उपचारांचा परिणाम होत नाही आणि त्यातच डॉक्टर दिल्लीला गेल्यामुळे चिडलेल्या एका माणसाने इंदौरमध्ये डॉक्टरच्या पत्नीची हत्या केली. त्याचबरोबर डॉक्टरांच्या मुलावरही हल्ला केला. रफीक रशीद असे आरोपीचे नाव आहे.

शालीमार एक्स्प्रेसमध्ये सापडलेल्या जिलेटिन कांड्या प्रकरणाला नवे वळण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक गेल्या काही महिन्यांपासून त्वचारोगाने त्रस्त आहे. तो उपचारांसाठी इंदौरमधील मालवा मिल्स भागातील डॉक्टर रामकृष्ण वर्मा यांच्याकडे जात होता. स्वतःच्या घरातच डॉक्टर दवाखाना चालवत आहेत. उपचार घेऊनही आजारातून रफिकला बरे वाटत नव्हते. गुरुवारी सकाळी तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी वर्मा यांची पत्नी लता (वय ५०) यांनी दरवाजा उघडला. डॉक्टर काही कामानिमित्त दिल्लीला गेले असल्याचे त्यांनी रफिकला सांगितले. हे ऐकल्यावर रफिकला एकदम राग आला आणि त्याने स्वतःकडील चाकूच्या साह्याने लता यांच्यावर वार केले. त्या मदतीसाठी ओरडू लागल्यावर त्यांचा मुलगा अभिषेक (वय १९) पळत पळत आला. रफिकने त्याच्यावरही हल्ला केला. पण इतक्यात आजूबाजूचे लोक तिथे आल्यावर रफिक पळून जाऊ लागला. पण नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

भांडूपमध्ये अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात युवा क्रिकेटपटूचा मृत्यू

शेजारच्या नागरिकांनी लगेचच लता आणि अभिषेक यांना रुग्णालयात नेले. पण उपचारांपूर्वीच लता यांना मृत घोषित करण्यात आले. तर अभिषेक याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

रफिकला याआधीही २०१५ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्याने काही वेळ तुरुंगवासही भोगला आहे.