पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मिरी जनतेला भेटू देणार का? राहुल गांधींचा राज्यपालांना खोचक सवाल

राहुल गांधी

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. काश्मीर खोऱ्यात हिसंक घटना घडत आहेत, अशी  टिप्पणी राहुल गांधींनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींनी काश्मीरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे म्हटले होते. यासाठी त्यांनी राहुल गांधींना काश्मीर खोऱ्यात येण्याचे निमंत्रणही दिले होते. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यासाठी विमान पाठवण्याची सोय करु, असे भाष्यही सत्यपाल मलिक यांनी केले होते.  

सत्यपाल मलिक यांना राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्त्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, प्रिय राज्यपाल सत्यपाल मलिकजी मी आणि विरोधी पक्षाचे शिष्टाचार मंडळ काश्मीर आणि लडाख दौऱ्यावर येण्याबाबतचे तुमचे निमंत्रण स्वीकारतो. आम्हाला विमान पाठवण्याची आवश्यकता नाही. पण तुम्ही आम्हाला तेथील जनता, सैनिक आणि नेत्यांना भेटू देणार का? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.  

J&K : राज्यपाल म्हणाले, राहुल गांधींसाठी खास विमान पाठवतो

जम्मू काश्मीरमधून हिंसाचार घडत असल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र पंतप्रधान मोदी यावर बोलायला तयार नाहीत, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी शनिवारी केली होती. त्यानंतर  राज्यपालांनी राहुल गांधींनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा याठिकाणी यावे, आणि मग येथील परिस्थितीवर भाष्य करावे, असे म्हटले होते.