पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकन खासदारांबरोबर बैठक रद्द का झाली?, जयशंकर यांनी सांगितलं कारण

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकन खासदारांबरोबर या आठवड्यात होणारी बैठक रद्द केली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, खासदारांच्या ज्या समूहाबरोबर जयशंकर यांची भेट होणार होती. यातील अमेरिकन काँग्रेसच्या प्रमिला जयपाल यांना हटवण्याची विनंती करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली नाही. 

भारतीय-अमेरिकन महिला काँग्रेसच्या प्रमिला जयपाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काश्मीरप्रकरणी भाष्य करत होत्या. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्व प्रकारचे प्रतिबंध हटवण्याची मागणी केली होती. 

प्रमिला यांनी काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्यावर टीका केली होती. जे लोक जम्मू-काश्मीरमधील स्थिती समजून घेण्यास सक्षम नाहीत. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असे मला वाटत नाही, असे जयशंकर यांनी म्हटले. त्यामुळे इतर खासदारांबरोबर आम्ही प्रमिला जयपाल यांची भेट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. खुल्या मनाने समस्यांवर चर्चा करण्यास तयार आहेत अशा लोकांना मी भेटू इच्छितो. ज्या लोकांनी आधीपासूनच आपले मत बनवले आहे, त्यांच्याशी चर्चा करुन काय फायदा, असेही त्यांनी म्हटले.

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार

दरम्यान, जयशंकर यांनी भारत-अमेरिकेदरम्यानची दुसरी 'टू प्लस टू वार्ता'च्य समारोपानंतर पाकिस्तानवर भाष्य केले. पाकिस्तानप्रश्नी ट्रम्प प्रशासनची भूमिका स्पष्ट आहे. इस्लामाबादने दहशतवादी समूहांवर लगाम लावण्यासाठी तात्काळ, सातत्यपूर्ण आणि पारदर्शक कारवाई करावी. तसेच दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, अशी ट्रम्प प्रशासनाची भूमिका आहे.

कोल्हापुरात पूरग्रस्त भागातील महिलांचा महामार्गावर रास्ता रोको

अमेरिकेत परराष्ट्र मंत्री माईक पॅम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी बुधवारी वॉशिंग्टनमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे स्वागत केले होते.

अमेरिकेत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयशंकर यांनी भारत आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांत शक्यता आणि विषय वस्तू संबंधी विस्तार झाल्याचे सांगितले. चर्चेत पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि दक्षिण पूर्व आशियासमवेत क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले.

CAA: हिंगोलीत ३ एसटी बस फोडल्या, २ जण जखमी