पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रो प्रयत्नशील

इस्रो

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाले होते. लँडिंगच्या काही मिनिटे आधी त्याचा इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला होता. पण विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. जेव्हापासून विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आहे. तेव्हापासून त्याच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

उमेदवारी जाहीर झाली नसतानाही खडसेंनी अर्ज भरला

सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होता. पण लँडिंगच्या काही मिनिटे आधी विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला होता. तेव्हापासून संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रावर रात्र सुरू झाल्यामुळे दहा दिवसांपूर्वी हे प्रयत्न थांबविण्यात आले होते. 

ऍट्रोसिटीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

इस्रोचे प्रमुख के शिवन यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सध्यातरी विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित केला जाऊ शकत नाही. तिथे सध्या रात्र आहे. पण पुन्हा तिथे दिवस सुरू झाल्यावर आम्ही प्रयत्न सुरू करू शकतो. चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर आणि रोव्हरचे आयुष्य एक चांद्रदिवस (आपल्याकडील १४ दिवस) इतके असल्याचे इस्रोकडून या मोहिमेच्या सुरुवातीला सांगितले होते. काही शास्त्रज्ञांनी आता पुन्हा विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होण अशक्य असल्याचे यापूर्वीच म्हटले आहे.