पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही दगड मारणाऱ्यांपैकी नाही, कोर्टात दाद मागू - फारुक अब्दुल्ला

फारुक अब्दुल्ला

कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय लोकशाही विरोधी आहे. आम्ही याविरोधात दगडफेक करणाऱ्यांमधले नाही. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्हाला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझा मुलगा तुरुंगात आहे, असे जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस तोंडघशी, काही आमदार कलम ३७० रद्द करण्याचा बाजूने

दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले नसून, ते त्यांच्या घरातच आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले. लोकसभेत कलम ३७० रद्द करण्याचे आणि जम्मू काश्मिरची पुनर्रचना करण्याचे विधेयक मंगळवारी मांडण्यात आले. त्यावेळी विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि द्रमुकचे नेते दयानिधी मारन यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना अमित शहा यांनी फारुक अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. ते त्यांच्या घरातच आहेत आणि कुठेही जाण्यास मुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले.

लोकसभेत या विषयावरील चर्चेत सहभाग घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी सभागृहात ४६२ क्रमांकाच्या जागेवर बसते. माझ्या शेजारी ४६१ क्रमांकावर फारुक अब्दुल्ला बसतात. ते जम्मू-काश्मीरमधून निवडून आले आहेत. पण त्यांची काय भूमिका आहे हे आज आपल्याला समजू शकत नाही. त्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय ही चर्चा अपूर्ण आहे, असे मला वाटते. 

... हा तर सत्तेचा गैरवापर, राहुल गांधींची कलम ३७० वरून सरकारवर टीका

दयानिधी मारन यांनी फारुक अब्दुल्ला यांना सरकारने अटक केली असल्याचा आरोप केला. सभागृहाचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी सदस्यांच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे, असेही ते म्हणाले.