पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याची ही वेळ नाही'

दिल्लीतील हिंसाचार (संग्रहित छायाचित्र)

दिल्ली हिंसाचारावेळी आणि त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. यासाठी दिल्ली पोलिसांना आणखी वेळ दिला जावा, अशी मागणी गुरुवारी केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली. दिल्ली पोलिसांची बाजू मांडताना त्यांनी ही मागणी केली. 

केंद्र आणि दिल्ली सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली - काँग्रेस

तुषार मेहता यांच्या मागणीला न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारासंदर्भात आतापर्यंत ४८ वेगवेगळे एफआयआर दाखल झाले आहेत. मग आणखी एफआयआर सध्या का नकोत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याचिकाकर्त्यांचे आणखी एक वकील कॉलिन गोन्सालविस यांनीही आम्ही कोणालाही अटक करण्याची मागणी केलेली नाही. फक्त एफआयआर दाखल करण्याची विनंती करतो आहोत. जर पोलिसांना तपासात पुरावे मिळाले नाहीत तर एफआयआर रद्द करता येऊ शकतो. एफआयआर दाखल केला नाही तर पुढे अटकही करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

T-20 WC: हॅटट्रिकसह भारतीय महिलांनी दिमाखात गाठली सेमीफायनल!

या प्रकरणात केंद्र सरकारलाही एक पक्षकार केले जावे, अशी मागणी महाधिवक्त्यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी एन पटेल आणि न्या. सी. हरशंकर यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली.