पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानभवनात येण्यापासून मलाच रोखले, बंगालमधील राज्यपालांचा सरकारवर गंभीर आरोप

राज्यपाल जगदीप धनखड

पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनखड आणि तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय कलगीतुरा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केला आहे. आपल्याला बंगालमधील विधानभवनात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर आपण माध्यम प्रतिनिधींसाठी राखीव असलेल्या प्रवेशद्वार क्रमांक ४ मधून विधानभवनात प्रवेश केला, असे त्यांनी सांगितले.

पीएनबी घोटाळा: नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित

या घटनेमुळे देशातील लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासला गेला आहे, असेही जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील विधानभवनाच्या परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक ३ हे राज्यपालांसाठी राखीव आहे. या प्रवेशद्वारातून केवळ राज्यपाल विधानभवनाच्या आवारात येऊ शकतात. पण आधी सूचना दिलेली असतानाही हे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. आपण येणार असल्याची सूचना दिलेली असतानाही प्रवेशद्वार क्रमांक ३ बंद का ठेवण्यात आले होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेचे अधिवेशन तहकूब करण्यात आले असले, तरी त्याचा अर्थ हे प्रवेशद्वार बंद ठेवावे असा होत नाही, असे जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.

बुधवारी राज्यपालांनी विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांना कळविले होते की आपण विधानभवनात येणार आहोत. तेथील सुविधा मला बघायच्या आहेत आणि ग्रंथालयातही जायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते.

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर जैसे थे, पाहा आणि मग पुढे जा धोरणाचा अवलंब

विधानसभेच्या अध्यक्षांनी मंगळवारी सभागृहाचे कामकाज अचानक दोन दिवसांसाठी तहकूब केले होते. या काळात जी विधेयक सरकार सभागृहात मांडणार होते. त्याला राज्यपालांची मंजुरी मिळालेली नसल्यामुळे अध्यक्षांनी अचानकपणे कामकाज दोन दिवसांसाठी तहकूब केले होते.