पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हुकुमशहा किम जोंगच्या आजारानंतर उत्तर कोरियात लष्करी हालचालींना वेग

किम जोंग उन

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगच्या गंभीर आजाराच्या बातम्या जगभरात वेगाने पसरल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या स्थानिक माध्यमांनुसार किम यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशात आता उत्तर कोरियाच्या लष्कराच्या हालचालींच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री जियोंग कोयोंग डो यांनी उत्तर कोरियाने आपल्या तोफखान्यांच्या चाचणीत आणि हवाई दलाच्या हालचालीत अचानक वाढ झाल्याचे म्हटले आहे. सैन्यदलाच्या या हालचालींमुळे तणाव वाढत असल्याचे वृत्त योनहेप या वृत्तसंस्थेने दिले आहे. 

कोरोनाचा प्रतिकार करण्यात भारतीय मानसिकदृष्ट्या सक्षम - चिनी तज्ज्ञ

छोट्या स्वरुपाच्या तोफखान्यांच्या फायरिंग ड्रिलबरोबर उत्तर कोरियाने यावर्षी पाच प्रमुख हत्यारांचे परीक्षण केले आहे. अखेरचे परीक्षण मागील आठवड्यात झाले होते. यादरम्यान उत्तर कोरियाने गोळीबार केला, जो पूर्व तटावरुन दिसले. त्याचदिवशी उत्तर कोरियाने पूर्व तटीय शहर वॉनसनच्या वर सुखोई-व्हॅरियंट फायटर जेट्स आणि मिग प्रकाराच्या विमानांचे उड्डाण करण्यात आले. पूर्व समुद्रात अनेक हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्र डागण्यात आले. 

कोरोनाचा परिणामः अमेरिकेत १९३० च्या मंदीनंतरची सर्वाधिक बेरोजगारी

उत्तर कोरियाच्या एलओसीबरोबरच चीनच्या सीमेजवळ आकाशात निगराणी हालचालीत वाढ झाली आहे, असे एका संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

दरम्यान, उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगची प्रकृती गेल्या काही महिन्यात खूपच बिघडली आहे. अति धुम्रपान, स्थुल प्रकृतीशी निगडीत आजार हे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. 

कोरोनाचा वेग मंदावला, काही आठवड्यांत मात करण्याची आशा: हर्षवर्धन

सीएनएनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या माध्यमांत आतापर्यंत किम जोंगच्या प्रकृतीबाबत काहीच प्रसिद्ध झालेले नाही. तेथील माध्यमे हे संपूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत.