पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्प यांच्याशी बोलणं फिस्कटलं, उ. कोरियाने राजदुताला दिला मृत्यूदंड

किम जोंग उन

उत्तर कोरियाने किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुसरी शिखर परिषद अयशस्वी ठरल्यानंतर आपल्याच राजदुताला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. एका दक्षिण कोरियन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार किम ह्योक चोल यांना उत्तर कोरियाने अमेरिकेबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी विशेष राजदूत म्हणून नेमले होते. त्यांच्याकडे हनोई बैठकीची रुपरेषा निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ते किम यांच्याबरोबर विशेष रेल्वेनेही गेले होते. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

मिळालेल्या माहितीनुसार, चोल यांना किम जोंग उन यांचा विश्वासघात केल्याप्रकरणी गोळ्या झाडून मारण्यात आले. चोसून इबो या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, तपासानंतर किम ह्योक चोलवर मार्चमध्ये मिरिम विमानतळावर विदेश मंत्रालयाच्या चार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर गोळ्या झाडण्यात आल्या. चोल हे फेब्रुवारीमध्ये हनोई शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टिफन बीगन यांच्या समकक्ष होते. 

महासत्तांचे व्यापारयुद्ध आणि भारत

यापूर्वी उत्तर कोरियाने अनेक ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिल्याचे वृत्त आलेले आहे. राजकीय सूत्रांनी दिलेल्या हवाल्यानुसार वृत्तपत्राने म्हटले आहे की, बैठकीदरम्यान एका चुकीमुळे किम जोंग उनने आपली महिला दुभाषी शिन हे यांगला कारागृहात टाकले होते. जेव्हा ट्रम्प यांनी 'नो डिल'ची घोषणा केली. तेव्हा शिनने किम यांच्या नव्या प्रस्तावाचे योग्य भाषांतर केले नव्हते. किम आणि ट्रम्प हे दोन्ही नेते व्हिएतनामच्या राजधानीतून कोणताही समजोता न करता निघून गेले होते. ते प्योंगयांग अणवस्त्र कार्यक्रमाबाबत कोणताही करार करु शकले नव्हते.

..तर उद्ध्वस्त करुन टाकू, ट्रम्प यांचा इराणला इशारा