पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही कोरोना विषाणूपासून पूर्णपणे मुक्त, उत्तर कोरियाचा दावा

उत्तर कोरियाचे हुकुमूशहा किम जोंग उन

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यातून अमेरिकाही बचावलेली नाही. चीनपेक्षाही जास्त बळी अमेरिकेत गेले आहेत. दरम्यान, उत्तर कोरिया संपूर्णपणे कोरोना विषाणू मुक्त झाल्याचा दावा त्या देशाच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने केला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जगात या विषाणूची सुमारे १० लाखांहून अधिक जणांना लागण झालेली आहे. चीनमध्ये या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर जानेवारी महिन्यातच या देशाने आपल्या सीमा बंद केल्या होत्या आणि या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली होती. 

लॉकडाऊन कसा संपवायचा, पंतप्रधानांनी मागविल्या शिफारशी

उत्तर कोरियाचे केंद्रीय आपत्कालीन महामारी विरोधी मुख्यालयाचे महामारी विरोधी विभागाचे संचालक पाक म्योंग सु यांनी दावा केला की, देशाचे प्रयत्न संपूर्णपणे यशस्वी ठरले. आमच्या देशात आतापर्यंत एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आलेली नाही. आमच्या देशात प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींची चाचणी करुन तसेच सर्व वस्तू संक्रमण मुक्त करण्याबरोबरच सीमा बंद करणे तसेच समुद्र आणि हवाई मार्ग बंद करण्यासारखे पाऊल योग्यवेळी उचलण्यात आले. त्यामुळेच आम्हाला यश आले. 

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोना; सोबतचे २३ जण क्वारंटाईन

उत्तर कोरियात कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे प्रकरण असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याचे दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेच्या एका महत्त्वाच्या लष्करी कमांडरने गेल्याच महिन्यात सांगितले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही उत्तर कोरियात काहीतरी सुरु असल्याचे म्हटले होते. त्यांनी उत्तर कोरियाचे हुकुमूशहा किम जोंग उन यांना पत्र पाठवून या विषाणूविरोधात एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

क्वारंटाइनमध्येही लोक ऐकायला तयार नाहीत, हॉस्पिटलमध्ये नमाज पठण सुरु