पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकार कलम ३७१ कधीच हटवणार नाही : शहा

अमित शहा

ईशान्य भारतातील राज्यांसाठी राज्यघटनेत असलेले कलम ३७१ कोणत्याही परिस्थितीत हटवणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी स्पष्ट केले. गुवाहाटीमध्ये आयोजित पूर्वोत्तर परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात पूर्वेकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.   

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) ची अंतिम यादी जाहीर केल्यानंतर अमित शहांनी पहिल्यांदाच आसाम दौऱ्यावर आले होते. राज्य घटनेतील कलम ३७१ चा भाजप सन्मान करते. सरकार या कलमात कोणत्याही परिस्थितीत बदल करणार नाही.

...म्हणून १०० दिवसांत काय झालं? काहींना समजलेचं नाही : मोदी

जम्मू काश्मीरमधील कलम हटवल्याचा दाखला देताना शहा म्हणाले की, कलम ३७० हे अस्थायी कलम होते. मात्र कलम ३७१ हे एका विशिष्ट संदर्भातील आहे. दोन्हीमध्ये फरक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यघटनेतील कलम ३७१ ईशान्य भारतातील सहा राज्यांसह ११ राज्यांना लागू आहे. कलम '३७१ अ' नुसार कोणत्याही व्यक्तीला नागालँडमध्ये जमीन खरेदी करता येत नाही. फक्त राज्यातील आदिवासी व्यक्ती जमीन खरेदी करू शकतात.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: north east no intention to change special status under article 371 said by home minister amit shah