पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्यरात्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाला घेराव, विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा

मध्यरात्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाला घेराव, विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा

सीएएवरुन ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान मंगळवारी रात्री जामिया मिलिया इस्लामियाचे विद्यार्थी आणि काही माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. रात्री उशिरा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अटक केली. आंदोलक विद्यार्थी दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्याची मागणी करत होते. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. 

रुग्णांना हलविण्यासाठी सुरक्षा पुरवा, दिल्ली हायकोर्टात रात्री सुनावणी

केजरीवाल यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचे आवाहन जामिया मिलिया इस्लामिया अल्युमनी असोसिएशन आणि जामिया को-ऑर्डिनेशन कमिटीने (जेसीसी) केले होते. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला, अशी माहिती एका आंदोलक विद्यार्थ्याने दिली. 

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्राची वृत्तवाहिन्यांसाठी सूचना

जेसीसीने आपल्या निवेदनात म्हटले की, आतापर्यंत अटक केलेल्या विद्यार्थ्यांना वकिलांशी भेटण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पोलिस त्यांना सोडत नाहीत. त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. तसेच मारहाणही करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत. आम्ही विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंतेत आहोत.  

दिल्ली हिंसाचारः आणखी चौघांचा मृत्यू, मृतांचा आकडा १८ वर

दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलक विद्यार्थ्यांनी एकत्र येत दिल्लीतील हिंसेसाठी जबाबदार लोकांविरोधात कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी घोषणाबाजीही केली. केजरीवाल यांनी हिंसाचाराने प्रभावित असलेल्या भागातील स्थानिक आमदारासह दौरा करावा आणि तणाव कमी करण्यासाठी शांतता मोर्चाचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:north east delhi violence Water cannons fired at students as they gherao Delhi CM Arvind Kejriwal home over violence