पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावधान! सोशल मीडियावर चिथावणीखोर व्हिडिओ पाठवल्यास ३ वर्षे कारावास

दिल्ली हिंसाचार

सोशल मीडियावर वातावरण खराब करण्यासाठी पसरवण्यात येत असलेल्या चुकीच्या आणि चिथावणीखोर व्हिडिओवरुन दिल्ली सरकारने सक्तीचे धोरण आखले आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ पसरवणाऱ्या लोकांवर सरकार आयटी एक्ट ५६ अ आणि आयपीसीचे कलम १५३ अ, ५०६ नुसार कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. त्यात ३ वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.

निर्भया प्रकरणः पुन्हा पेच, आता दोषी अक्षयने दाखल केली नवीन दया याचिका

दिल्ली सरकार लवकरच एक व्हॉट्सअप नंबर जारी करणार आहे. नागरिकांकडे अशा पद्धतीचे कोणतेही व्हिडिओ जे धार्मिक रुपाने चिथावणीखोर असतील आणि सामाजिक वातावरण खराब करणारे असतील. यावरुन सरकारला निर्दशनास आणून द्या, असे आवाहन सरकारने केले आहे. हा व्हिडिओ कुठून आला आहे. कोणत्या नंबरवरुन पाठवण्यात आला आहे. किंवा सोशल मीडियावर कोणी शेअर केला, ही सर्व माहिती नागरिकांना दिल्ली सरकारला द्यावी लागेल. सरकार दिल्ली पोलिसांच्या मदतीने अशा लोकांवर कारवाई करेल. यामध्ये ३ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर 'गोली मारो...'चे नारे, ६ जणांना अटक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत आता शांतता आहे. परंतु, सोशल मीडियावर चुकीचा व्हिडिओ जारी करुन सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारने अशा लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षण सुनावणीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:north-east Delhi violence sentenced to 3 years on Sending inflammatory videos on social media