पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचारः आणखी चौघांचा मृत्यू, मृतांचा आकडा २० वर

दिल्ली हिंसाचार

सीएए कायद्यावरुन ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या आणखी वाढली आहे. या हिंसाचारातील मृतांचा आकडा १३ वरुन २० झाला आहे. गुरु तेग बहादुर रुग्णालयाने आणखी ७ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. 'एएनआय'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. 

रविवारी सीएए कायद्याचे समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमध्ये हिंसाचार झाला. मंगळवारीही हा हिंसाचार सुरु होता. ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर आदि भागांमध्ये झालेल्या हिंसाचारात सुमारे २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात ५६ पोलिसांचाही समावेश आहे.

दरम्यान, हिंसाचार प्रभावित परिसरात पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून हिंसा करणाऱ्याला आता दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा हिंसाचार प्रभावित भागाचा दौरा केला. त्यांनी सीलमपूर, भजनपुरा, मौजपूर, यमुना विहारसारख्या हिंसा प्रभावित भागाचा आढावा घेतला.