अभिनेता शाहरुख खानच्या चुलत बहिणीचे पाकिस्तानातील पेशावरमध्ये मंगळवारी दीर्घ आजारानं निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या तोंडाच्या कर्करोगावर उपचार घेत होत्या अशी माहिती शाहरुखची बहीण नूर जहान यांचे पती असिफ बुरहान यांनी दिली. नूर जहान या ५२ वर्षांच्या होत्या. त्या राजकारणात सक्रीय देखील होत्या. २०१८ साली पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला होता.
सहा वर्षांपूर्वी निधन झालेल्या महाराजांवर अद्याप अंत्यसंस्कार नाही
शाहरुखचे वडील आणि जहानचे वडील यांच्यात भावंडांचं नातं होतं. नूर जहान या दूरध्वनीद्वारे शाहरुखच्या संपर्कात होत्या. त्या १९९७ साली आणि २०११ साली शाहरुखला भेटण्यासाठी भारतात आल्या होत्या, त्यावेळी त्यांच्यासोबत पती आसिफदेखील होते. बालपणी शाहरुख देखील दोनदा पेशावरमध्ये आपल्या नातलगांना भेटण्यासाठी गेला होता.
बोर्डिंग गेटपर्यंत जाणे ही प्रवाशांची जबाबदारी, सुप्रीम कोर्टाचा निकाल
सध्या शाहरुख हा मनोरंजन विश्वापासून लांब आहे. २०१८ साली त्याचा 'झिरो' चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला होता. त्यानंतर शाहरुखनं चित्रपटातून काही काळ विश्रांती घेण्याचं ठरवलं.