पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर काँग्रेसमध्ये उभी फूट पडेल

गांधी कुटुंब

गांधी घराण्यातील एखाद्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाकडे काँग्रेसचे अध्यक्षपद दिले तर पक्षात उभी फूट पडेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाचे नेतृत्त्व प्रियांका गांधी यांच्याकडे द्यावे, असे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नटवरसिंह यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी गांधी कुटुंबातील व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाकडे पक्षाचे अध्यक्षपद द्यावे, असे मत मांडले आहे. पण अद्याप पक्षाने अध्यक्षपदी कोण येणार हे निश्चित केलेले नाही. 

चांद्रयान-२ चे आज उड्डाण; मोहीम यशस्वी होणार- इस्रो प्रमुख

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमधील गोळीबारानंतर प्रियांका गांधी यांनी तिथे जाऊन पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. याचे नटवरसिंह यांनी कौतुक केले. पक्षाचे नेतृत्त्व करण्यास प्रियांका गांधी सक्षम आहेत. त्यांनी सोनभद्र भेटीवेळी त्यांच्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. पोलिसांनी रोखल्यानंतरही त्या तिथे थांबल्या आणि पीडितांची भेट घेऊनच परतल्या. त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला पाहिजे, असे नटवरसिंह यांनी म्हटले आहे.

नटवरसिंह म्हणाले, गांधी घराण्यातील व्यक्तीशिवाय दुसऱ्या नेत्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. पक्षाचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांनीच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गांधी कुटुंबानेच आता एकत्रित बसून या निर्णयावर विचार केला पाहिजे आणि तो मागे घेतला पाहिजे. त्यानंतरच प्रियांका गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. 

अभिनेत्रीच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून लुटले ४० हजार

माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांचा मुलगा अनिल शास्त्री यांनीही प्रियांका गांधी यांच्याकडेच पक्षाने अध्यक्षपद दिले पाहिजे, असे म्हटले आहे. पक्षामध्ये अध्यक्षपदासाठी १०० टक्के स्वीकारार्ह असे एकच नाव आहे. ते म्हणजे प्रियांका गांधी, असे त्यांनी स्पष्ट केले.