पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी काँग्रेसच्या न्याय योजनेच्या सल्लागारांपैकी एक

अभिजित बॅनर्जी

या वर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे अभिजीत बॅनर्जींचा त्या लोकांमध्ये समावेश आहे, ज्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश असलेल्या बहुचर्चित न्याय (एनवायएवाय) योजनेची रुपरेषा तयारी केली होती. बॅनर्जी यांना नोबेल मिळाल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बॅनर्जी यांना शुभेच्छा देताना मोदी सरकारच्या आर्थिक नीतींवर निशाणा साधत त्यांनी गरिबी वाढवणारा 'मोदीनॉमिक्स' असा शब्दप्रयोग केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही बॅनर्जी यांना शुभेच्छा देत त्यांनी बनवलेल्या मॉडेलवरुन प्रेरित होत त्यांच्या सरकारने दिल्लीत शाळांची स्थिती बदलल्याचे म्हटले.

काँग्रेसने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन टि्वट केले की, नोबेल पुरस्कार २०१९ मिळवल्याबद्दल अभिजित बॅनर्जींचे अभिनंदन. गरिबी दूर करण्यासाठी केलेल्या त्यांच्या अविश्वसनीय कामावर देशाला गर्व आहे, काँग्रेस पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पथदर्शी 'न्याय' कार्यक्रमाचे ते महत्त्वाचे सल्लागार होते. 

भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्राचे नोबेल

दरम्यान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात किमान उत्पन्न योजना (न्याय) लागू करण्याचे आश्वासन दिले होते. न्याय योजने अंतर्गत देशातील सर्वांत गरीब ५ कोटी कुटुंबीयांना दर महिना ६००० रुपये किंवा वार्षिक ७२००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. २५ कोटी लोकसंख्येला याचा लाभ होणार होता.

PHOTO: जपानमध्ये 'हगीबिस' चक्रीवादळाचा हाहाकार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nobel prize winner Abhijit Banerjee helped congress NYAY scheme in loksabha election 2019 says rahul gandhi