भौतिक शास्त्रातील २०१९ चा नोबेल पुरस्कार मूळ कॅनडाचे असलेले अमेरिकन शास्त्रज्ञ जेम्स पीबल्स आणि स्वित्झर्लंडचे मायकल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांना जाहीर करण्यात आला आहे.
2019 Nobel Prize in Physics has been awarded with one half to Canadian-American James Peebles 'for theoretical discoveries in physical cosmology' & the other half jointly to Swiss scientists Michel Mayor & Didier Queloz 'for discovery of an exoplanet orbiting a solar-type star'. pic.twitter.com/01tbaGtDne
— ANI (@ANI) October 8, 2019
काँग्रेस निवडणूक जिंकण्याची शक्यता कमीच, सलमान खुर्शीद यांचे वक्तव्य
जेम्स पीबल्स यांना फिजिकल कॉस्मोलॉजीतील सैद्धांतिक शोधासाठी पुरस्कार दिला जात आहे. तर मायकल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांना सूर्यासारख्या ताऱ्याला एक्झोप्लेलेट ऑर्बिटिंग संबंधित शोधासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
नोकऱ्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत हे स्वीकारा- उद्धव ठाकरे
दरम्यान, या पुरस्कारातील अर्धा हिस्सा हा जेम्स यांना दिला जाणार आहे. तर दुसरा हिस्सा हा मेयर आणि डिडियर यांनी वितरित केला जाणार आहे. नोबेल पुरस्कार विजेत्यांना १० डिसेंबरला स्टॉकहोम येथे एकत्र येतील. तिथे त्यांना पुरस्काराचे वितरण केले जाईल.
सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध; तरुणांनी पाठवला दोन हजारांचा चेक
पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ पीबल्स (८४) यांचा जन्म कॅनाडा येथे झाला. पण नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. मेयर (७७) यांचा जन्म स्वित्झर्लंडमधीर लोसाने येथे झाला. ते जिनेव्हा विद्यापीठाशी निगडीत आहेत. तर डिडियर हे जिनेव्हा विद्यापीठ आणि ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठाशी जोडले गेलेले आहेत.
गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळ, SPG सुरक्षा काढण्याची चर्चा