पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुडइनफ, व्हिटिंघम आणि योशिनो यांना रसायन शास्त्राचा नोबेल पुरस्कार

रसायन शास्त्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर

रसायन शास्त्रातील २०१९ च्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉन गुडइनफ, ब्रिटनचे शास्त्रज्ञ स्टॅनली व्हिटिंघम आणि जपानचे शास्त्रज्ञ अकिरा योशिनो या तिघांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आयन बॅटरीच्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

निवडणूक कोणाशी लढायची, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सचे जनरल सेक्रेटरी अॅलान रॉयल यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्काराची घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्स यांनी सांगितले की, 'कमी वजन, रिचार्ज करणारी आणि पॉवरफुल बॅटरीचा वापर  मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत सर्व ठिकाणी केला जात आहे.' 

... असे असणार राष्ट्रपती, पंतप्रधानांचे नवे 'एअर फोर्स वन' विमान

दरम्यान, मंगळवारी भौतिक शास्त्रातील २०१९ चा नोबेल पुरस्कार मूळ कॅनडाचे असलेले अमेरिकन शास्त्रज्ञ जेम्स पीबल्स आणि स्वित्झर्लंडचे मायकल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांना जाहीर करण्यात आला आहे. जेम्स पीबल्स यांना फिजिकल कॉस्मोलॉजीतील सैद्धांतिक शोधासाठी पुरस्कार दिला जात आहे. तर मायकल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांना सूर्यासारख्या ताऱ्याला एक्झोप्लेलेट ऑर्बिटिंग संबंधित शोधासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

शेतकरी उगीच आत्महत्या करत नाहीत, शरद पवार यांचे सूचक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Nobel Prize for Chemistry awarded to John B Goodenough M Stanley Whittingham and Akira Yoshino