पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी पश्चिम बंगालचा प्रस्ताव वगळला

ममता बॅनर्जी

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या संचालनामध्ये पश्चिम बंगालचा चित्ररथ असणार नाही. एकूण १६ राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सहा मंत्रालयांचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. एवढ्याच राज्यांचे आणि मंत्रालयाचे चित्ररथ संचलनात सहभागी होतील. पण पश्चिम बंगालचा चित्ररथ असणार नाही. 

'अखिलेश यादव यांनी महिनाभर पाकिस्तानात राहावे मग त्यांना कळेल'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताहेत. त्याचबरोबर सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर) याविरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे. याविरोधात पश्चिम बंगालमध्ये मोर्चे काढण्यात येत असून, त्याचे नेतृत्त्व ममता बॅनर्जीच करीत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचा चित्ररथा संदर्भातील प्रस्ताव स्वीकारण्यात न आल्याने यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, दोन बैठकांमध्ये या संदर्भात विविध राज्यांकडून आणि मंत्रालयाकडून आलेल्या प्रस्तावांचे परीक्षण करण्यात आले. चित्ररथाचा विषय काय आहे, संकल्पना काय आहे, त्याचे डिझाईन कसे असणार आणि ते दिसणार कसे, या सर्वांचा विचार करण्यात आला. राजपथावरील संचलनामध्ये मर्यादित वेळ उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचाही विचार करावा लागतो. 

विदर्भात गारपिटीसह पाऊस; पिकांचे मोठे नुकसान

यंदाच्या वर्षी एकूण ५६ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ३२ प्रस्ताव राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांकडून आणि २४ प्रस्ताव मंत्रालयांकडून आले होते. यापैकी २२ प्रस्ताव निवडण्यात आले आहेत. पाच बैठकांनंतर हे प्रस्ताव निवडण्यात आले, असे या प्रवक्त्याने सांगितले.