पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये 'ते' सीट महादेवासाठी राखीव ? IRCTC ने दिलं उत्तर

काशी महाकाल एक्स्प्रेसच्या (वाराणसी ते इंदूर) कोच B5 च्या सीट नंबर ६४ चे भगवान शिव यांच्या छोट्या मं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसी ते इंदूर दरम्यान धावणाऱ्या काशी महाकाल एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. रेल्वेत महादेवासाठीही एक सीट आरक्षित ठेवण्यात आले होते. त्यावरुन हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी धर्मनिरपेक्षतेचा हवाला देत प्रश्न उपस्थित केला होता. आता या वादावर आयआरसीटीसीने स्पष्टीकरण दिले असून हे फक्त उद्घाटनासाठी होते, असे म्हटले आहे. या प्रकल्पाच्या यशासाठी भगवान शंकराचे आशीर्वाद मिळण्यासाठी असे केले होते, असेही आयआरसीटीसीने सांगितले.

ब्रिटनच्या महिला खासदाराचा भारत सरकारवर आरोप

आयआरसीटीसीने आपल्या निवेदनात म्हटले की, रविवारी उद्घाटनादरम्यान पूजेसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी एक अप्पर बर्थवर तात्पुरते श्री महाकालचे छायाचित्र ठेवले होते. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी यावर आक्षेप नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅग करत टि्वट केले होते. यावेळी त्यांनी संविधानाची प्रस्तावनेचे एक छायाचित्र त्याचबरोबर 'एएनआय यूपी' चे एक टि्वट रिटि्वट केले होते. 'एएनआय'च्या टि्वट मध्ये म्हटले होते की, काशी महाकाल एक्स्प्रेसच्या (वाराणसी ते इंदूर) कोच B5 च्या सीट नंबर ६४ चे भगवान शिव यांच्या छोट्या मंदिरात रुपांतर करण्यात आले आहे. रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. 

काशी महाकाल एक्स्प्रेस ३ ज्योतिर्लिंग-इंदूर नजीकचे ओंकारेश्वर, उज्जैनचे महाकालेश्वर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथला जोडते. या रेल्वेची पहिली व्यावसायिक यात्रा २० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.