पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधानांनी ट्रम्प यांना विनंती केली नाही, जयशंकर यांचे स्पष्टीकरण

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

काश्मीर मुद्द्याप्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती केली नव्हती, असे स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संसदेत दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास आपणास सांगितल्याचे वक्तव्य केले होते. त्यांचा हा दावा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी फेटाळला होता. तरीही त्याचे पडसाद आज संसदेतील दोन्ही सभागृहात उमटले. काँग्रेससह विरोधी पक्षांनी याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी स्वतः खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सरकारची बाजू मांडली. 

काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांचा दावा खोटा, मोदींनी मदतीची मागणी केलीच नाही

मी सभागृहाला आश्वस्त करतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची कोणतीच विनंती केलेली नाही. पाकिस्तानबरोबरील जे काही मुद्दे आहेत, ते सर्व दि्वपक्षीय स्तरावर सोडवले जावेत यावर ठाम आहे. शिमला करार आणि लाहोर घोषणेनुसार भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा कोणताही प्रश्न दि्वपक्षीय स्तरावरच सोडवला जाईल, असे जयशंकर यांनी म्हटले. 

काश्मीर हा तर भारत-पाकचा दि्वपक्षीय मुद्दा, अमेरिकेची कोलांटउडी

पंतप्रधान मोदी यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मोदी आणि मी मागील महिन्यात जपानमधील ओसाका येथील जी-२० शिखर संमेलनात काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली होती. त्यावेळी मोदी यांनी आपल्याला काश्मीर मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव सादर केला होता, असा ट्रम्प यांनी दावा केला होता. दरम्यान, हा दावा भारताने फेटाळला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:No such request made by PM Modi says foreign minister S Jaishankar on Trumps Kashmir mediation claim