पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लैंगिक शोषणाचे आरोप; सरन्यायाधीश गोगोई यांना क्लीन चिट

सरन्यायाधीश रंजन गोगोई  (Sonu Mehta/HT PHOTO)

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या अंतर्गत चौकशी समितीने सोमवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रार फेटाळली आहे. न्या. शरद बोबडे हे या समितीचे अध्यक्ष तर न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. इंदू मल्होत्रा या इतर दोन सदस्य होत्या. या समितीला सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही. 

सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांकडून सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, अंतर्गत समितीने आपला अहवाल ५ मे २०१९ रोजी सोपवला आहे. अंतर्गत प्रक्रियेनुसार पुढील वरिष्ठ न्यायाधिशांकडे हा अहवाल देण्यात आला असून त्याची एक प्रत संबंधित न्यायाधिशांनाही (सरन्यायाधीश) पाठवली आहे. 

सरन्यायाधीशांविरोधात कट? निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी

अंतर्गत चौकशी समितीला सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी महिला कर्मचारीने १९ एप्रिल २०१९ ला केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. या समितीचा अहवाल इंदिरा जयसिंह खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने २००३ च्या निर्णयानुसार सार्वजनिक केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरन्यायाधीशांविरोधातील आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीतून न्या. रमणा यांची माघार