पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीचा प्रश्नच नाही - राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

काश्मिरच्या मुद्दयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. त्याचबरोबर त्यांना या प्रश्नात मध्यस्थी करण्याची विनंतीही केली नाही, असे पुन्हा एकदा केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लोकसभेत अशी कोणतीही शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. दुसरीकडे याच मुद्द्यावरून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या सदस्यांनी लोकसभेतून सभात्याग केला.

मोदी सरकारविरोधात अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करणार?

लोकसभेत राजनाथ सिंह म्हणाले, नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवेळी काश्मिरच्या मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे. या विषयामध्ये अमेरिकेने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच येत नाही. तसे करणे दोन्ही देशांमध्ये झालेल्या सिमला कराराच्या विरोधात आहे.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या दोघांनी पत्रकारांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची विनंती नरेंद्र मोदी यांनी केली असल्याचे सांगितले. त्यावरून देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला. दोन दिवसांपासून विरोधक हाच मुद्दा संसदेत लावून धरीत आहेत. या प्रकरणी खुद्द नरेंद्र मोदी यांनीच निवेदन करून काय घडले ते सांगावे, अशी विरोधकांची मागणी आहे. 

पाकिस्तानात ४० दहशतवादी गट कार्यरत होते, इम्रान खान यांची कबुली

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर लगेचच त्यांच्या प्रशासनाने या विधानावरून माघार घेतली. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय संबंध आहे. या दोन्ही देशांनी मागणी केल्यास अमेरिका त्यांना प्रश्न सोडविण्यासाठी मदत करेल, असे ट्रम्प यांच्या प्रशासनाने सांगितले.