पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्तारपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी इम्रान खान यांच्याकडून आणखी सवलती

इम्रान खान

पाकिस्तानातील कर्तारपूरमधील दरबार साहिब गुरुद्वारा येथे जाणाऱ्या शीख बांधवांसाठी शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन खास सवलती जाहीर केल्या. यामध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी पासपोर्ट बाळगण्याची गरज पडणार नाही. फक्त भाविकांकडे इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र असले पाहिजे. त्याचबरोबर कर्तारपूरला जाण्यासाठी १० दिवस आधी नावनोंदणी करण्याची अटही रद्द करण्यात आली. शीख बांधव थेटपणे या ठिकाणी जाऊ शकतात.

बगदादीच्या मृत्यूनंतर आयसिसच्या नव्या म्होरक्याचं नाव जाहीर

शुक्रवारी सकाळी ट्विटरच्या माध्यमातून इम्रान खान यांनी या दोन सवलती जाहीर केल्या. कर्तारपूरमधील दरबार साहिब गुरुद्वारा हे शीख बांधवांचे श्रद्धास्थान आहे. कर्तारपूरमधील हा गुरुद्वारा आणि पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक गुरुद्वारा यांना जोडण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये यासाठी करारही करण्यात आला आहे.

सेनेचं दबावतंत्र, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

या करारामुळे कर्तारपूरला दरबार साहिब गुरुद्वाराला जाणाऱ्या शीख भाविकांसाठी पाकिस्तानच्या व्हिसा घेण्याची गरज राहिलेली नाही. कर्तारपूरला जाण्यासाठी पूर्वपरवानगी घेतल्यावर भाविक तिथे जाऊ शकतात. आता भाविकांना पासपोर्ट बाळगण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक भाविकांनी या ठिकाणी येण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.