पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नितीश कुमार पुन्हा महाआघाडीत आल्यास हरकत नाही - राबडी देवी

नितीश कुमार

राष्ट्रीय जनता दलातील एका वरिष्ठ नेत्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महाआघाडीमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी विचारल्याच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांनी त्याला आपली कोणतीही हरकत नसल्याचे म्हटले आहे. "जर नितीश कुमार पुन्हा महाआघाडीमध्ये सहभागी झाले तर आम्हाला त्यावर कोणताही आक्षेप नाही," असे राबडी देवी यांनी सोमवारी रात्री सांगितले. पण त्यांनी हे स्पष्ट केले की यावरील कोणताही निर्णय राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेतेचे घेतील.

माजी केंद्रीय मंत्री रघुवंशप्रसाद सिंह यांनी नितीश कुमार यांना हिंदूत्त्ववादी पक्षाविरुद्ध लढण्यासाठी महाआघाडीमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राबडी देवी यांनी हे वक्तव्य केले आहे. नितीश कुमार नक्कीच त्यांची भूमिका बदलतील, पण ते कधी होईल किंवा ते काय बोलतील हे कोणीही सांगू शकत नाही. पूर्वी हे अनेकवेळा घडले आहे. हे आश्चर्यकारक अजिबात नाही. मला असे वाटते की भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे रघुवशंप्रसाद सिंह यांनी म्हटले आहे.

नितीश कुमार यांनी एका दिवसात जनता दल संयुक्तच्या आठ जणांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. यावेळी मित्र पक्ष भाजपला त्यांनी विचारातही घेतले नाही. त्यामुळे बिहारमध्ये दोन्ही पक्षांमधील दुरावा वाढल्याची चर्चा आहे.

केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय जनता दल संयुक्तने घेतल्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रामध्ये भाजपने जनता दलाला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्याची तयारी दर्शिवली होती. त्याला नितीश कुमार यांच्या पक्षाने विरोध केला.

जुलै २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी असलेल्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून या दोन्ही पक्षांमधील संबंध बिघडलेले आहेत.