पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR

कोरोना विषाणू (प्रतिकात्मक छायाचित्र)

ज्या कोरोना विषाणूमुळे कोविड १९ आजार होतो, त्याच्या जनुकीय रचनेमध्ये प्रामुख्याने तीन उपप्रकार (व्हायरस स्ट्रेन्स) आढळले होते. सध्या तरी मुख्य व्हायरस स्ट्रेन्समध्ये कोणताही बदल झाल्याचे शास्त्रज्ञांना संशोधनात आढळून आलेले नाही. केंद्र सरकारकडून शुक्रवारी ही माहिती देण्यात आली. सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळेच या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग ६.२ दिवस इथपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आधी हा वेग ३ दिवस होता. म्हणजे ३ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या आधीच्या तुलनेत दुप्पट होत होती.  पण आता त्यासाठी ६.२ दिवस लागताहेत, असे सरकारने म्हटले आहे.

'टाळेबंदी राहणारच, परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार'

सार्स-कोव्ह-२ असे या विषाणूचे शास्त्रीय नाव आहे. या विषाणूच्या जनुकीय रचनेचा अभ्यास शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्येही हे काम करण्यात आले आहे. त्या माध्यमातून या विषाणूचे तीन उपप्रकार आढळून आले आहेत. ज्याला व्हायरस स्ट्रेन्स म्हणतात. याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी माहिती दिली.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात या विषाणूच्या जनुकांचा अभ्यास केल्यावर ते डिसेंबरमध्ये चीनमध्ये आढळलेल्या विषाणूच्या जनुकासारखेच असल्याचे दिसून आले. दुसऱ्या अभ्यासात इराणमध्ये सापडलेल्या विषाणूची जनुके आणि वुहानमध्ये आढळलेल्या विषाणूची जनुके बऱ्यापैकी एकसारखीच असल्याचे दिसून आले. अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये केलेल्या अभ्यासात तिसऱ्या प्रकारचा व्हायरस स्ट्रेन्स आढळून आला होता. 

नौदलातील किमान २० जणांना कोरोनाची लागण

या विषाणूच्या जनुकांमध्ये लवकर बदल होत नसल्याचे दिसून आले आहे. आता भारतात नेमका कोणता व्हायरस स्ट्रेन्स वेगाने पसरतो आहे, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे, असेही रमण गंगाखेडकर यांनी म्हटले आहे.