पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या कोणतीही बैठक नियोजित नाही - केंद्र सरकार

नरेंद्र मोदी

शांघाय सहकार्य संघटना परिषदेमध्ये बिश्केक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय बैठक नियोजित नसल्याचे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ही माहिती दिली. 

पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. १४ फेब्रुवारीला हा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बालाकोटमधील त्यांच्या तळांवर भारताने हवाई हल्ले केले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला. पाकिस्तानने त्यावेळी भारताच्या दिशेने एफ १६ लढाऊ विमान धाडली होती. त्याला भारतीय विमानानी चोख प्रत्युत्तर देत भारतीय हवाई हद्दीत येण्यापासून रोखले होते. 

रेपो दरात पाव टक्क्यांची कपात, कर्जे आणखी स्वस्त होणार

२००८ मध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी मुंबईत घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये रचनात्मक औपचारिक बैठक झालेली नाही. २००८ मधील हल्ल्यांनंतर पाकिस्तानने सात जणांना अटक केली होती. त्यापैकी कोणालाही अद्याप शिक्षा झालेली नाही. दहशतवाद्यांवर कारवाई करीत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करण्यास भारताने याआधीच नकार दिला आहे.