पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवादी घाबरलेत म्हणूनच बालाकोटनंतर मोठा हल्ला नाही - माजी हवाई दल प्रमुख

माजी हवाई दल प्रमुख बी एस धनोआ

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी गेल्यावर्षी बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांतून देशाच्या लष्करी कारवायांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचेच दिसून आले होते, असे मत माजी हवाई दल प्रमुख बी एस धनोआ यांनी बुधवारी व्यक्त केले. बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले.

पुण्यात वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराकडून वसुल केला ४२ हजारांचा दंड

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत धनोआ यांनी म्हटले आहे की, भारतीय लष्कर आपल्या कारवाया कशा पद्धतीने करते त्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचेच हे उदाहरण होते. पाकिस्तानात जाऊन तेथील दहशतवादी तळ भारतीय सैन्याकडून उदध्वस्त केले जातील, असे कधी त्यांना वाटले नव्हते. पण भारताने ही कारवाई यशस्वीपणे करून दाखविली. आता या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. आज मागे वळून पाहताना माझ्या मनात समाधानाची भावना आहे. या कारवाईतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर अनेक गोष्टी नव्याने अमलात आणण्यात आल्या. 

रुग्णांना हलविण्यासाठी सुरक्षा पुरवा, दिल्ली हायकोर्टात रात्री सुनावणी

बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशातील लोकसभा निवडणुकीच्या काळात एकही मोठा हल्ला दहशतवाद्यांकडून घडवून आणण्यात आला नाही. दहशतवाद्यांमध्ये भीती होती की पुन्हा हल्ला केला तर भारताकडून आणखी जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असेही धनोआ यांनी म्हटले आहे. 

गेल्यावर्षी १४ फेब्रुवारीला जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर १२ दिवसांत भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये जाऊन जैशचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.