पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनातून बरा झालेला दिल्लीतील रुग्ण म्हणतोय, हॉस्पिटलमध्ये खूप वेबसीरिज बघितल्या

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूची लागण झालेला दिल्लीतील पहिला रुग्ण आता या आजारातून पूर्णपणे बरा झाला आहे. त्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील वास्तव्याच्या काळात त्यांना आलेल्या अनुभवांमुळे ते जास्त समाधानी आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये मिळालेल्या अत्युच्च दर्जाच्या सेवेमुळे त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडे एकमेव जालीम उपाय - तज्ज्ञ

या रुग्णाने आपले अनुभव 'हिंदुस्थान टाइम्स'कडे शेअर केले आहेत. ते म्हणाले, मला खरंतर विश्वासच बसत नव्हता. सरकारी रुग्णालयात राहावे लागणार या विचाराने माझ्या अंगावर त्यावेळी शहारा आला होता. पण सफदरजंग रुग्णालयातील स्थिती खूप वेगळी होती. एखाद्या लक्झरी हॉटेलमध्ये राहात असल्यासारखेच मला वाटले. रुग्णालयाच्या माझ्या खोलीतील स्वच्छता उच्च दर्जाची होती. दिवसातून दोन वेळा बेडशीट, उशीचे अभ्रे बदलण्यात येत होते, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे रुग्णालयात मोबाईल वापरण्यास परवानगी असल्यामुळे मला फार कंटाळा आला नाही. मी घरी व्हिडिओ कॉल करत होतो आणि नेटफ्लिक्सवर वेगवेगळ्या वेबसीरिज बघत होतो, असे त्याने सांगितले. 

जेव्हा मला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी सुरुवातीला मी घाबरलो होतो. मी आता मरणार असेच मला वाटले. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी मला खूप धीर दिला. माझ्यातील लक्षणे खूप सौम्य स्वरुपाची आहेत. केवळ खोकला आणि ताप आहे. त्यामुळे घाबरण्याचे अजिबात कारण नाही. मी पूर्ण बरा होईन, असा विश्वास डॉक्टरांनी दाखवला, असेही या व्यक्तीने सांगितले.

निर्भया प्रकरणातील दोषींच्या आई-वडील आणि मुलांची दयामरणाची मागणी

रुग्णालयातील नर्स, मावश्या या सर्वांच्या सेवेबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या व्यक्तीला आता पुढील १४ दिवस घरातच विलगीकरण पद्धतीने विश्रांती घेण्याचे निर्देश डॉक्टरांनी दिले आहेत.