पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व नोंदणी यादीत नाव नसले तरी हिंदूंना देश सोडावा लागणार नाही - मोहन भागवत

मोहन भागवत

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यादीत नाव नसले तरी कोणत्याही हिंदूला देशातून बाहेर पाठविण्यात येणार नाही, याची हमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी दिली. कोलकातामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोहन भागवत बोलत होते. बंद खोलीत झालेल्या या बैठकीत सहभागी झालेल्या सूत्रांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्रीसाहेब खोटं बोलताना जीभ कचरत नाही का, धनंजय मुंडेंचा सवाल

आसाममध्ये अंतिम नागरिकत्व नोंदणी यादीमध्ये नाव नसलेल्या हिंदूंनाही देश सोडून जावे लागणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या अंतिम यादीतून १९ लाख लोकांना वगळण्यात आले आहे. यापैकी अनेक जण हे बंगाली हिंदू आहेत. 

काश्मीरमधील ५० हजार बंद मंदिरं पुन्हा उघडणार, सरकारची तयारी सुरु

या भागातील बेकायदा घुसखोरांना हुडकून काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काम करण्यात येत आहे. त्याचवेळी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून आलेल्या गैर मुस्लिम लोकांना देशाचे नागरिकत्व बहाल करण्यासाठीची प्रक्रिया सोपी असावी, यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणीही संघाने केली आहे. 

हिंदूंच्या निवासासाठी भारत हा एकमेव देश असल्यामुळे त्यांना किचकट प्रक्रियेत न अडकविता नागरिकत्व दिले जावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.