पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानची कटूता: भारतीय जवानांकडून मिठाई घेण्यास नकार

भारत-पाकिस्तान

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम - ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानची चिडचिड होत आहे. तेव्हापासून पाकिस्तान वारंवार आक्रमक अशा भूमिका घेत असून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आज बकरी ईदच्या निमित्ताने भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या जवानांना मिठाई देण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्ताने भारताकडून मिठाई घेण्यास नकार दिला.

Reliance Jio GigaFiberची प्रतीक्षा संपली, ७०० रुपयांपासून प्लॅन्स

दरवर्षी, ईदच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेले जवान एकमेकांना मिठाई देत ईदच्या शुभेच्छा देतात. आज बकरी ईदच्या निमित्ताने अटारी- वाघा बॉर्डर आणि हुसैनीवाला बॉर्डरवर बीएसएफच्या जवानांनी दरवर्षीप्रमाणे परंपरा जपत पाकिस्तानी जवानांना मिठाई देण्याचा प्रय्तन केला. मात्र पाकिस्तानी जवानांनी मिठाई घेण्यास नकार दिला. 

मुकेश अंबानींनी केली जिओ फायबरची घोषणा, ५ सप्टेंबरला लाँच

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी बकरी ईदला भारताकडून दिली जाणारी मिठाई घेतली जाणार नसल्याचे पाकिस्तानी जवानांनी सांगितले होते. दरम्यान, सीमेवर तैनात असलेले दोन्ही देशाचे सैन्य सणाच्या दिवशी एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा देतात. सीमेवर चांगले वातावर रहावे, तसंच दोन्ही देशातील कटुता संपुष्टात यावी हा यामागचा मुख्य उद्देश असतो. तर, जून महिन्यात ईदच्या दिवशी अटारी-वाघा बॉर्डरवर एकामेकांना मिठाई दिली होती. 

राज्यासह देशभरामध्ये ईद उत्साहात