पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन राज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध

भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढते आहे. पण त्याचे प्रमाण कमी आहे.

मलेरियारोधक हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मर्यादित प्रमाणात निर्यात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशात या औषधाचा तुटवडा नसल्याची माहिती विविध राज्यांतून पुढे आली आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या प्रतिनिधीने या संदर्भात विविध राज्यांशी संपर्क साधल्यानंतर ही माहिती पुढे आली.

देशात कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार ७३४ वर, २४ तासांत ५४० नवे रुग्ण

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना गरज पडल्यास हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देणे उपयुक्त ठरत आहे. यामुळे कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी करणे, रुग्णांना लवकर बरे करणे शक्य होत असल्याचे दिसून आले आहे. चीनमध्ये या संदर्भात संशोधन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर भारताने आधी या औषधाची निर्यात तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला प्रत्युत्तर देण्यात येईल असे म्हटले होते. या कठीण प्रसंगात एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाची अंशतः निर्यात सुरू केली.

कोरोना: आर्थिक अडचणीत करदात्यांना मोठा दिलासा!

सध्या महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, केरळ या राज्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. यापैकी जवळपास सर्वच राज्यांनी त्यांच्याकडे या औषधांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात असल्याचे म्हटले होते. काही राज्यांनी या औषधांच्या खुल्या विक्रीवर आधीपासूनच निर्बंध आणले आहेत. त्यामुळे औषधांच्या दुकानात हे औषध मिळत नाही. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.